होळी-धुलिवंदनचे पार्श्वभुमीवर एकुण ७,०८०/- रु.किंमतीची देशी दारुची कारवाई

शिरपूर शहर पो.स्टे. हद्दीत होळी व धुलिवंदनचे पाश्र्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत असतांना पोलीस निरीक्षक श्री रविंद्र देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जातोडे ते बाळदे ता. शिरपुर जि. धुळे गावाचे रोडवरी एका बंद टपरीचे आडोशाला इसम नामे - संदीप एकनाथ पाटील रा.बाळदे ता. शिरपुर हा स्वतःचे फायदयासाठी त्याचे कब्जात गावठी हात भट्टीची दारु कब्जात बाळगुन तिची चोरटी विक्री करीत असल्याबाबत मिळालेल्या माहीतीवरुन डी. बी पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करणे बाबत आदेशीत केल्यावरुन त्यांनी सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन वरनमुद इसमास त्याचेजवळील एकुण ३,०००/- रु. किं. ची गा.ह.भ.ची दारु व मुद्येमालासह ताब्यात घेवून त्याचेविरुध्द पोकॉ/४४७ भुषण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर शहर पो.स्टे. गु.र.नं. १५४ / २०२२ म.प्रो.का.क.६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तसेच पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर जि. धुळे शहरात मच्छीबाजार मध्ये एका बंद टपरीचे आडोशाला इसम नामे - दिनेश मोतीलाल माळी रा. नथ्थु नगर कुंभारटेक शिरपुर हा स्वतःचे फायदयासाठी त्याचे कब्जात देशी दारुच्या बाटल्या कब्जात बाळगुन त्यांची चोरटी विक्री करीत असल्याबाबत मिळालेल्या माहीतीवरुन डी. बी पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करणे बाबत आदेशीत केल्यावरुन त्यांनी सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन वरनमुद इसमास त्याचेजवळील एकुण ४०८०/ रु. किं. ची देशी दारुच्या टैंगो पंच कंपनीच्या एकुण १३६ बाटल्या ९० मि.ली. च्या सह ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द पोकॉ/१४६१ विनोद आखडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर शहर पो.स्टे. गु.र.नं. १५५/२०२२ म.प्रो.का.क.६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र देशमुख, शिरपुर शहर पो.स्टे. डी. बी. पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, लादुराम चौधरी, पोकों गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रविण गोसावी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार (आर.सी.पी.) व चापोहेकॉ/नसीर पठाण अशांनी केली आहे.

टिप्पण्या