*अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 6 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू .....*

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 6 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि 29 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग ते थाळनेर रस्त्यावर पाल्लवी हॉटेलच्या पुढे एका अज्ञात भरधाव वाहनाने आलीया दगडू तडवी रा. आभोडा तालुका रावेर या 6 वर्षीय चिमुरडीला जोराने धडक दिल्याची घटना आज दि 29 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. यात आलीया हिचा जागिच मृत्यू झाला आहे. हॉटेल पाल्लवीच्या पुढे पपई तोडणी करणारे रावेर तालुक्यातील मजूर कुटुंब राहतात. मयत आलीया ही रस्त्याच्याकडेला असतांना थाळनेरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने आलीया या चिमुरडीला चिरडल्याची घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मयत आलीया हिला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पण्या