पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

स्री शिक्षणाचा प्रणेत्या, पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी होते.यावेळी प्रमुख पाहुणे श्री वासुदेव देवरे माजी उपनगराध्यक्ष शि.व.न.परिषद,श्री गोपाल ठाकरे हे होते.सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी इ ८ वी चा विद्यार्थीनी जान्हवी राजपूत व दिव्या भोई यांनी भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के एन काजी श्री एम एम बैसाणे जेष्ठ शिक्षक श्री एस एस पावरा श्री ए एच कोळी श्री व्हि पी सोनवणे श्रीमती एस जी वाडीले श्री एस जे पावरा, श्री एस एस धाकड पी बी वारूळे श्री ए के गुजर श्री जे जी महाजन श्रीमती पी बी बोरसे श्रीमती पी के पाटील श्रीमती जे एन महाजन श्रीमती पी आर राजपूत श्रीमती एन यु माळी उपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार श्री वाय एन गिरासे यांनी केले.

टिप्पण्या