तोरणमाळ घाटात होळी साजरा करुन येणाऱ्या प्रवासी ॲपेरिक्षा उलटली 11जण जखमी,जीवित हानी नाही,

तोरणमाळ घाटात होळी सण साजरा करुन येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणारी ॲपेरिक्षा उलटून 11जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. 
नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ घाटात काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास ॲपेरिक्षा उलटली. तोरणमाळ येथुन होळी सण साजरा करुन परत येत असताना हा अपघात घडला.यात चालकाला रिक्षा वरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना उपचारासाठी म्हसावद ग्रामीण रूग्णालयात १०८च्या साह्याने दाखल करण्यात आल्याचे समजते.

टिप्पण्या