*स्वर्गीय तात्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिरपूर शहरात विवि .....*

शिरपूर तालुका जनसंघ भाजपाचे ज्येष्ठ नेते , शेतकरी कामगार मजूर व जनसामान्यांचे लोकनेते , माजी आमदार व शिरपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय तात्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिरपूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे* .. शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या सभागृहात तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन कार्यक्रम दिनांक 4 / 2 / 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे .. तसेच भारतीय जनता पार्टी कार्यालय शिरपुर येथे स्वर्गीय तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील यांच्या नवीन तैलचित्राचे (फोटो) अनावरण व प्रतिमा पूजन कार्यक्रम शिरपूर *तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री काशीराम दादा पावरा व युवकांचे प्रेरणास्थान मा. श्री भूपेशभाई पटेल ( माजी नगर अध्यक्ष ) व धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री तुषार भाऊ रंधे यांच्या शुभहस्ते आयोजित केले आहे*.. *कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री बबनराव चौधरी (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ) यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक तसेच भाजपा चे ज्येष्ठ नेते मा. श्री मोहन हुलेसिंग पाटील (मनू दादा) आणि ज्येष्ठ नेते मा. श्री रावसाहेब प्रभाकर तुकाराम चव्हाण ( माजी नगर अध्यक्ष ) व किशोर माळी ( तालुका अध्यक्ष भाजपा ) यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे ..*
तसेच इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे .... तरी शिरपूर तालुक्यातील व शहारातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सन्मानिय कार्यकर्ते आणि तात्यासाहेबांनवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिक बंधू भगिनींनी सदर कार्यक्रमात covid-19 नियमांचे पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन शिरपूर भारतीय जनता पार्टी शहर व तालुका, भारतीय जनता युवा मोर्चा शहर व तालुका पाटील वाडा मित्र मंडळ खालचे गाव शिरपूर व नगरसेवक हेमंत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या