शिरपूर येथील पांडू बापू माळी मुन्सिपल हायस्कूल येथे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती निमित्त मराठी राजभाषा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एम एम बैसाने हे होते तर कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस जी वाडीले श्रीमती पी बी बोरसे श्रीमती एन यु माळी ज्येष्ठ शिक्षक ए एच कोळी,व्ही पी सोनवणे, एस डी माळी,एस एन कोळी,आर पी गावित, जी एस पावरा श्री वाय एन गिरासे हे उपस्थित होते.
सुरवातीला सरस्वती व ज्ञानेश्वरी पूजन करण्यात आले. र्विद्यार्थ्योनी कविता, मराठी अभिमान गीत, लेखक परिचय, मराठी साहित्यातील गाजलेल्या पुस्तकांचे समिक्षण असे उपक्रम सादर केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री एच एम माळी यांनी मराठी भाषेचा संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी सतत झटले पाहिजे, दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी श्री जे जी महाजन,श्री पी बी वारुळे, श्रीमती जे एन महाजन यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती पी आर राजपूत तर आभार श्रीमती एन यु माळी यांनी मानले.shirpurnews90
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा