*पा बा मा विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*

शिरपुर येथील पां.वा.मा. म्यु. हायस्कुल शिरपुर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपतीशिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी होते. सुरवातील मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले.यावेळी उपमुख्याध्यापक श्री ए एस कानडे पर्यवेक्षक श्री के एन काजी श्री एस आर गवळी अधीक्षक श्री जे बी जाधव जेष्ठ शिक्षक श्री एस एस पावरा श्री ए एच कोळी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी
उपस्थित होते.इयत्ता 9 वी चा विद्यार्थी मनिष सैंदाणे याने पोवाडा सादर केला.विद्यालयातील शिक्षक श्री पी बी वारुळे यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज याचा गौरवशाली इतिहास मांडला.यावेळी आजादी का अमृतमहोत्सव निमित्त आयोजित रांगोळी देशभक्ती व लोरी स्पर्धेत सहभागी श्रीमती पी बी बोरसे श्रीमती एस एस वसावे श्रीमती एम एन जैन श्रीमती पी के पाटील श्री सुरेन्द्र पावरा श्रीमती जे एस सोनवणे श्रीमती एम पी चव्हाण श्रीमती जे एन महाजन यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी श्री एच के पाटील श्री बी ए मोरे श्री जे जी महाजन यांनी सहकार्य केले.सुत्रसंचलन श्री ए एस कानडे यांनी केले तर आभार श्री ए एस कानडे यांनी केले

टिप्पण्या