*पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल यांच्यावतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले*

शिलपूर वरवाडे नगरपरिषद व पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल यांच्यावतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात शासनस्तरावर हवामान व पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. त्याअंतर्गत शिरपुर वरवाडे नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भामरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद व
पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी तुषार नैरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनात विद्यार्थ्याच्या प्रयत्नांतून वेगवेगळ्या प्रकारची विविध आकर्षक रंगाची फुले, वेगवेगळ्या आकारातील पान, तोरण महिलांची आभूषणे तयार करण्यात आली. झाडे लावण्यासाठी तुटलेल्या बादल्यांपासून सिमेंटच्या पोत्यांपर्यंत अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला. प्लास्टिक बाटल्यांपासून आकर्षक सजावटीच्या वस्तु, तसेच पेन स्टॅणा तयार करण्यात आले. त्याचबरोबर जुन्या टी-शर्ट, जीन्सपासून अँग वनविण्यात आल्या. शीतपेयांच्या मोठ्या बाटल्या जुन्या खराब झालेल्या सीडी आइस्क्रिम स्टिक्सचा चांगला उपयोग करून शोभिवंत वस्तू बनविण्यात आल्या कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगरअभियंता माधवराव पाटील, नगरसेविका संगिता देवरे, नगरसेविका रेखा सोनार, मुख्याध्यापक के.पी. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक ए.एस. कानडे, पर्यवेक्षक के. एन. काजी, एम. एम. बैसाणे, एस.आर. गवळी, अधीक्षक जे.बी. जाधव, जे.एस. सोनवणे, एस.जी. वाडीले उपस्थित होते. प्रदर्शनासाठी आर.पी. गावित, सुरेन्द्र पावरा, जेजी. महाजन, एच.के. पाटील, बी.ए. मोरे, डी. एच. राजपूत, जी. एस. जयेश खैरे, एम.पी. चव्हाण, जे.एन. महाजन, पी.के. पाटील, एस.एस. वसावे यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक जेज़ी, महाजन, सुत्रसंचलन वाय.एन गिरासे तर आभार प्रदर्शन ए.एस. कानडे यांनी केले.

टिप्पण्या