*भीषण अपघात, महिला आणि पुरुष दोघांचा मृत्यू...*

मोटरसायकलीने जात असतांना मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव कारने धडक दिल्याने मोटरसायकल वरील महिला व पुरुष दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबत कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.😓 काकाना शिरपूर न्यूज चैनल कडून भावपूर्ण श्रद्धांजलि 😥 मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 10 रोजी अमळनेर तालुक्यातील नगाव गडखांब येथील पंढरीनाथ गणपत वारुळे वय 55 हे मोटारसायकलीने आशाबाई शालिग्राम मराठे यांना घेऊन नरडाणा रेल्वेस्टेशनवरुन शिरपूरच्या दिशेने जात असतांना शिरपूरहुन धुळ्याकडे भरधाव जाणारी एम. एच. 02 सीएल 8496 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने मोटरसायकलीला जोराने धडक दिली. यात पंढरीनाथ वारुळे यांचा जागिच मृत्यू झाला तर आशाबाई मराठे या दुरवर फेकल्या गेल्या त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले मात्र यावेळी आशाबाई मराठे यांचा ही मृत्यू झाला. याबाबत नरडाणा पोलीस स्टेशनात कारचालक मयूर रवींद्र चौधरी रा.धुळे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या