*राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा शानदार उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*

शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र काम सुरू - माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचे प्रतिपादन. शिरपूर - आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा शानदार उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेपासून राजगोपाल भंडारी माझा विश्वासू सहकारी, परिवारातील सदस्य म्हणून राहिले आहे. माझ्या सर्व सुखदुःखात सातत्याने सोबत राहून सर्वांच्या भल्यासाठी, संस्थेच्या प्रगतीसाठी वाईटपणा घेऊन अंमलबजावणी करतात. राजुभाऊ यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. तालुक्याचे भविष्य घडविण्यासाठी त्यांचे योगदान खूप मोठे व महत्त्वाचे आहे. गेल्या 35 वर्षांपासून तालुक्याचे भविष्य घडवायचे काम मी करीत आहे. शिरपूर पॅटर्न मार्फत तालुक्यात अहोरात्र काम सुरु असून एक एक थेंब पाणी जमिनीत जिरवायचे काम आपण करतोय. प्रत्येकाला सुखी जीवन प्रदान करायचे आहे. 40 वर्षे सेवा करणारे राजगोपाल भंडारी, नंतर यापुढे प्रभाकरराव चव्हाण, अशोक कलाल, बापू कोळी ड्रायव्हर यांचेही नाव कुठेतरी द्यायचे आहे. या सर्वांनी माझ्या सोबत सावली प्रमाणे राहिले आहेत. तालुक्याच्या सुखी संपन्नतेसाठी आता आपण 5 विविध मेडिकल कॉलेजेस आणत आहोत. नव्या पिढीला घडवायचे आहे, शिरपूर तालुक्याला आता शैक्षणिक हब करीत आहोत. मुंबई प्रमाणे अत्याधुनिक असे 740 बेड चे आपण हॉस्पिटल उभारतोय. शहर व तालुक्यातील हजारो लोकांशी माझा ऋणानुबंध आहे. आमदार काशिराम पावरा यांच्या सारखा प्रामाणिक आमदार तालुक्याला आपण सर्वांनी दिला आहे. सर्वांचे जीवनमान बदलायचे आहे त्यासाठी गेल्या 40 वर्षांपासून काम करीत आहोत. भूपेशभाई पटेल हे सर्वांसाठी मनापासून काम करतात. पटेल परिवाराला आपण तालुक्याने फार प्रेम दिले. शिरपूर चे नाव देशात करतोय आपण. ही ईश्वरीय देण आहे की असंख्य लाखो लोक माझ्या सोबत आहेत. शिक्षक, शिक्षिका यांनी आपल्या कुटुंबा प्रमाणे सर्वांसाठी काम करुन हे ईश्वरीय कार्य सतत करत रहा असे भावनिक आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले. आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा रिमोटच्या साहाय्याने शानदार उद्घाटन सोहळा रविवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी संस्था अध्यक्ष, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन, टेक्स्टाईल पार्क चेअरमन चिंतनभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, बबनलाल अग्रवाल, नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, सौ. शोभा राजगोपाल भंडारी, सी. ए. नंदन मालू (राजुभाऊ जावई), भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, सुभाष कुलकर्णी, एस. व्ही. के. एम. मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे, एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल प्रोजेक्ट डायरेक्टर जी. बी. गुजर, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्या डॉ. शारदा शितोळे, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, अभियंता ईश्वर पाटील, अभियंता पद्माकर शिरसाठ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, तालुक्यातील विविध संस्था पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात सचिव प्रभाकरराव चव्हाण म्हणाले, गेल्या 38 वर्षांपासून राजगोपाल भंडारी व आम्ही भाईं सोबत राहिलो. त्यांनी भाई व भाईंच्या प्रत्येक कार्यात मनापासून साथ दिली. संस्थेच्या 80 शाखा प्रगतीपथावर सुरु आहेत. भाऊंनी अनेकदा वाईटपणा घेऊन काटकसर व अभ्यासपूर्ण काम करुन संस्था व इतर सर्व कामात मोठे काम केले. एस. व्ही. के. एम. ट्रस्टी, व्यवसायात अग्रेसर, उमवि सदस्य, अनेकदा नगरसेवक, अनेक पदांवर कार्यरत राहून यशस्वीपणे काम केले. यावेळी राजगोपाल भंडारी यांचा सपत्नीक सत्कार भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. सृतिका शुभम राठी यांनी राजगोपाल भंडारी यांचे रेखाटलेले अप्रतिम रेखाचित्र अनावरण भाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रउदय व प्रमुख खान्देश विशेषांक प्रकाशन कु. प्रिशा भंडारी या चिमुकली मुलीच्या हस्ते करण्यात आले. संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, मला छोट्या कार्यकर्त्याला मोठा सन्मान भाईंनी दिला. मला सर्वांनी साथ दिली. शैक्षणिक, आर्थिक व प्रत्येक निर्णयात भाईं सोबत मी वाटचाल केली. पिपल्स बँक चेअरमन, एस. व्ही. के. एम. संस्था ट्रस्टी, आर. सी. पटेल संकुल तसेच अनेक पदांवर मी भाईंच्या मार्गदर्शनाखाली काम केले. भाईंच्या रथाचे आम्ही चार चाके आहोत. राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, अशोक कलाल, बापू ड्रायव्हर. भाई प्रत्येक बाबीची खात्री केल्या शिवाय व ते पारखून घेतल्या शिवाय काम करत नाहीत. ते नेहमी सर्वांच्या पाठीशी राहतात, नेहमी कामांबाबत पाठपुरावा करतात. संस्थेच्या 80 शाखा सुरु आहेत, शिस्तप्रिय कडक धोरण अवलंबून वाईटपणा घेऊन मी काम केले. माझे नेहमीच आयुष्यभर शैक्षणिक कार्यात वाहून घेतले आहे. भूपेशभाई पटेल यांचे कार्य महान आहे. कोणतेही काम ते खूप सुंदर रीतीने करतात. हॉस्पिटल अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूल, विविध शाळाआर्किटेक्ट च्या मागे लागून ते चांगल्या पद्धतीने काम करतात, पटेल परिवाराशी आम्ही एकनिष्ठ आहोत, पारिवारिक सदस्य,परिवाराने प्रेम दिले. संस्थेत सीईओ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, शिपाई हे सर्व जण कामे उत्कृष्ट काम करतात. मला सर्वांची साथ लाभली, संस्थेचा कर्मचारी नेहमी सोबत आहे, भाईंचे अनंत उपकार आहेत, मी नेहमी माझे कर्तव्य पार पाडतो. एस. व्ही. के. एम. हॉस्पिटलचे प्रोजेक्ट डायरेक्टर गुलाबराव गुजर यांनी आपल्या मनोगतात भाई, पटेल परिवार व राजुभाऊ यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेच्या प्रगतीत व इतर अनेक बाबतीत राजगोपाल भंडारी यांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी केले. राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा शानदार उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र काम सुरू - माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचे प्रतिपादन. शिरपूर - आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा शानदार उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेपासून राजगोपाल भंडारी माझा विश्वासू सहकारी, परिवारातील सदस्य म्हणून राहिले आहे. माझ्या सर्व सुखदुःखात सातत्याने सोबत राहून सर्वांच्या भल्यासाठी, संस्थेच्या प्रगतीसाठी वाईटपणा घेऊन अंमलबजावणी करतात. राजुभाऊ यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. तालुक्याचे भविष्य घडविण्यासाठी त्यांचे योगदान खूप मोठे व महत्त्वाचे आहे. गेल्या 35 वर्षांपासून तालुक्याचे भविष्य घडवायचे काम मी करीत आहे. शिरपूर पॅटर्न मार्फत तालुक्यात अहोरात्र काम सुरु असून एक एक थेंब पाणी जमिनीत जिरवायचे काम आपण करतोय. प्रत्येकाला सुखी जीवन प्रदान करायचे आहे. 40 वर्षे सेवा करणारे राजगोपाल भंडारी, नंतर यापुढे प्रभाकरराव चव्हाण, अशोक कलाल, बापू कोळी ड्रायव्हर यांचेही नाव कुठेतरी द्यायचे आहे. या सर्वांनी माझ्या सोबत सावली प्रमाणे राहिले आहेत. तालुक्याच्या सुखी संपन्नतेसाठी आता आपण 5 विविध मेडिकल कॉलेजेस आणत आहोत. नव्या पिढीला घडवायचे आहे, शिरपूर तालुक्याला आता शैक्षणिक हब करीत आहोत. मुंबई प्रमाणे अत्याधुनिक असे 740 बेड चे आपण हॉस्पिटल उभारतोय. शहर व तालुक्यातील हजारो लोकांशी माझा ऋणानुबंध आहे. आमदार काशिराम पावरा यांच्या सारखा प्रामाणिक आमदार तालुक्याला आपण सर्वांनी दिला आहे. सर्वांचे जीवनमान बदलायचे आहे त्यासाठी गेल्या 40 वर्षांपासून काम करीत आहोत. भूपेशभाई पटेल हे सर्वांसाठी मनापासून काम करतात. पटेल परिवाराला आपण तालुक्याने फार प्रेम दिले. शिरपूर चे नाव देशात करतोय आपण. ही ईश्वरीय देण आहे की असंख्य लाखो लोक माझ्या सोबत आहेत. शिक्षक, शिक्षिका यांनी आपल्या कुटुंबा प्रमाणे सर्वांसाठी काम करुन हे ईश्वरीय कार्य सतत करत रहा असे भावनिक आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले. आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" चा रिमोटच्या साहाय्याने शानदार उद्घाटन सोहळा रविवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी संस्था अध्यक्ष, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन, टेक्स्टाईल पार्क चेअरमन चिंतनभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, बबनलाल अग्रवाल, नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, सौ. शोभा राजगोपाल भंडारी, सी. ए. नंदन मालू (राजुभाऊ जावई), भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, सुभाष कुलकर्णी, एस. व्ही. के. एम. मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे, एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल प्रोजेक्ट डायरेक्टर जी. बी. गुजर, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्या डॉ. शारदा शितोळे, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, अभियंता ईश्वर पाटील, अभियंता पद्माकर शिरसाठ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, तालुक्यातील विविध संस्था पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात सचिव प्रभाकरराव चव्हाण म्हणाले, गेल्या 38 वर्षांपासून राजगोपाल भंडारी व आम्ही भाईं सोबत राहिलो. त्यांनी भाई व भाईंच्या प्रत्येक कार्यात मनापासून साथ दिली. संस्थेच्या 80 शाखा प्रगतीपथावर सुरु आहेत. भाऊंनी अनेकदा वाईटपणा घेऊन काटकसर व अभ्यासपूर्ण काम करुन संस्था व इतर सर्व कामात मोठे काम केले. एस. व्ही. के. एम. ट्रस्टी, व्यवसायात अग्रेसर, उमवि सदस्य, अनेकदा नगरसेवक, अनेक पदांवर कार्यरत राहून यशस्वीपणे काम केले. यावेळी राजगोपाल भंडारी यांचा सपत्नीक सत्कार भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. सृतिका शुभम राठी यांनी राजगोपाल भंडारी यांचे रेखाटलेले अप्रतिम रेखाचित्र अनावरण भाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रउदय व प्रमुख खान्देश विशेषांक प्रकाशन कु. प्रिशा भंडारी या चिमुकली मुलीच्या हस्ते करण्यात आले. संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, मला छोट्या कार्यकर्त्याला मोठा सन्मान भाईंनी दिला. मला सर्वांनी साथ दिली. शैक्षणिक, आर्थिक व प्रत्येक निर्णयात भाईं सोबत मी वाटचाल केली. पिपल्स बँक चेअरमन, एस. व्ही. के. एम. संस्था ट्रस्टी, आर. सी. पटेल संकुल तसेच अनेक पदांवर मी भाईंच्या मार्गदर्शनाखाली काम केले. भाईंच्या रथाचे आम्ही चार चाके आहोत. राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, अशोक कलाल, बापू ड्रायव्हर. भाई प्रत्येक बाबीची खात्री केल्या शिवाय व ते पारखून घेतल्या शिवाय काम करत नाहीत. ते नेहमी सर्वांच्या पाठीशी राहतात, नेहमी कामांबाबत पाठपुरावा करतात. संस्थेच्या 80 शाखा सुरु आहेत, शिस्तप्रिय कडक धोरण अवलंबून वाईटपणा घेऊन मी काम केले. माझे नेहमीच आयुष्यभर शैक्षणिक कार्यात वाहून घेतले आहे. भूपेशभाई पटेल यांचे कार्य महान आहे. कोणतेही काम ते खूप सुंदर रीतीने करतात. हॉस्पिटल अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूल, विविध शाळाआर्किटेक्ट च्या मागे लागून ते चांगल्या पद्धतीने काम करतात, पटेल परिवाराशी आम्ही एकनिष्ठ आहोत, पारिवारिक सदस्य,परिवाराने प्रेम दिले. संस्थेत सीईओ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, शिपाई हे सर्व जण कामे उत्कृष्ट काम करतात. मला सर्वांची साथ लाभली, संस्थेचा कर्मचारी नेहमी सोबत आहे, भाईंचे अनंत उपकार आहेत, मी नेहमी माझे कर्तव्य पार पाडतो. एस. व्ही. के. एम. हॉस्पिटलचे प्रोजेक्ट डायरेक्टर गुलाबराव गुजर यांनी आपल्या मनोगतात भाई, पटेल परिवार व राजुभाऊ यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेच्या प्रगतीत व इतर अनेक बाबतीत राजगोपाल भंडारी यांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी केले. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या