*मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर क्र 46 वर SRP जवानांनी भरलेला बसचा अपघात;17 सैनिक जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली.*

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सुरत जिल्ह्यातील कोसंबा नजीक सकाळी सैनिकी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला.आज सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 46 वर प्रचंड धुके असल्याने रस्त्यावर काहीही दिसत नसल्याने सैनिक बसचा अपघात झाला. घटनास्थळी तात्कालिक आजूबाजूचे नागरिक सैनिकांचा मदतीला धावून आले.
गुजरात पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 एस.आर.पी जवान बस मधून वडोदराहून सुरत येथे जात असतांना सकाळी धुके असल्याने महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रक न दिसल्याने सैनिकांनी भरलेली बस ट्रकला मागून जोरदार धडकली.या अपघातात 17 सैनिक जखमी झाली आहे. चार सैनिकांना पायाला गंभीर दुखापत झाली आहे.तर 13 सैनिकाना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात होताच जवळील किम सरकारी रुग्णालयात उपचारासाठी सैनिकांना दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. एस.आर.पी जवानांची एक तुकडी वडोदराहून सुरत येथील उधना येथे येत असताना अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. अपघातात गुजरात पोलिसांची सीआरपीएफ सैनिकाची बस चा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.मोठे नुकसान झाले आहे. काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती स्थानिक पोलिसांनी त्यानंतर वाहतूक सुरळीत केली. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या