*पां बा मा म्यु.हायस्कूल प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*

पां बा मा म्यु.हायस्कूल शिरपूर येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. शिरपूर येथील पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या लोकांचा सन्मान करून साजरी करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर माजी नगराध्यक्ष श्री प्रभाकर चव्हाण सौ.स्नेहा नेरकर माजी नगरसेवक इरफान मिर्झा सामाजिक कार्यकर्ते फिरोज काजी प्रशासकीय अधिकारी श्री संजय हसवाणी मुख्य अभियंता श्री माधवराव पाटील श्री भाईदास भोई सौ.कल्याणी लाढे उपमुख्याध्यापक श्री ए एस कानडे पर्यवेक्षक श्री एम एम बैसाणे श्री के एन काजी श्री एस आर गवळी श्रीमती जे एस सोनवणे श्रीमती एस जी वाडीले श्री एस एस पावरा यांची उपस्थिती. यावेळी करोना काळात आरोग्य सेवा पुरवणारे शहरातील सुप्रसिद्ध डॉ अतुल बडगुजर यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती जे महाजन यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शालेय परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सौ.प्रमिला सारसर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्कृष्ट घोषवाक्य तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कु.कृतिका राजपूत व कु पुर्वा बागुल यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी श्री आर सी पावरा श्री जे जी महाजन, श्री बी ए मोरे, श्री एच के पाटील श्री डी एच राजपूत श्रीमती जे एन महाजन, श्रीमती एम पी चव्हाण श्रीमती एस एस वसावे श्रीमती एम एन जैन भिमा माथने दिपक जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस व्ही गिरासे श्री वाय एन गिरासे यांनी केले तर आभार श्री ए एस कानडे यांनी मानले. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या