शिरपूर शहर पोलिसानी गुजराती कॉम्प्लेक्स जवळ एकूण ५ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.....

शहरातून मद्याची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी कारसह एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ५ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरपूर शहरातून मद्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून सायंकाळी सातपासून शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स परिसरात वाहनांची तपासणी केली होती. त्यात शिरपूर फाट्याकडे जाणाऱ्या कारचा (एमएच -१८, एजे-०८१५) आल्याने पोलिसांनी संशय चालकाला थांबवले. त्यात ७ हजार २५० रुपये किमतीच्या इंपिरिअल ब्ल्यू. व्हिस्कीच्या प्रत्येकी दोन लिटरच्या एकूण पाच बाटल्या, सात हजार २०० रुपयांच्य ओसीओसी ब्ल्यू व्हिस्कीच्या ४८ बाटल्या, सहा हजार ९६० रुपये किमतीच्या डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या ४८ बाटल्या असा मद्यसाठा आढळला आला होता. कारसह मद्यसाठ्याची एकूण किंमत ५ लाख २१ हजार ४१० रुपये आहे. मद्याची अवैध वाहतूक केल्याने चालक किशोर श्यामराव पाटील (वय ४१, रा. पिंप्राळा, नरडाणा ता. शिंदखेडा जि धुळे) याला अटक करण्यात आली आहे. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या