*अवैध मद्य साठ्यावर पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई : विदेशी कंपनीच्या लांखोच्या मद्य व वाहनसह १८,८०,७२०/- रु. कि. मुद्देमाल हस्तगत...*

*पिंपळनेर*
‌‌ पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, धुळे यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्यान अवैद्य धंदेबाबत तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समूळ उच्चाटन करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पो.स्टे. हद्दीतील आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा सिमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग तसेच गोपनीय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करण्यात येत होत्या. रविवार दिनांक ३०/०१/२०२२ रोजी ११ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गुप्त बातमी मिळाली की, पोलीस स्टेशन हद्दीतील धामंदर शिवारातील विरखेल धरणाच्या बाजुला पत्र्याचे शेडमध्ये विदेशी मद्याचा साठा केला जातो आणि तेथुन वाहनात अवैधरित्या विदेशी दारु भरुन गुजरात राज्यात वाहतुक केली जाते. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी स्टापसह छापा टाकला असता इसम १) संदिप राजकुमार शर्मा, वय २४ वर्ष धंदा रा. लोहाणे, ता.जि. भिवाने राज्य हरीयाणा २) प्रकाश मोहने बागुल वय २३ वर्ष, रा. पिंपळनेर हे फॉरच्युनर कार क्रमांक एम.एच.४३ ए. बी. ४१११ या वाहनाचे डिक्कीमध्ये विदेशी दारु भरुन जात असतांना त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सलीमभाई ऊर्फ विक्कीभाई यांचे मदतीने माल खरेदी करुन पत्र्याचे शेडमध्ये अवैध मद्य साठा करून गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करून घेऊन जातो असे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील वाहनामध्ये व त्यांनी साठा करून ठेवलेल्या पत्र्याचे शेडमध्ये मिळुन आलेले मद्याचे व वाहनाचे वर्णन खालील प्रमाणे ९४,३६०/- रु. इम्पलेरियल ब्ल्यु व्हिस्कीची १३४८ बॉटल १८० मि.ली. च्या वाहनाच्या डिक्कीमध्ये ईम्पेलेरियल ब्ल्यु व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, ऑल सिझन कंपनीची व्हिस्की, हायवर्डस बिअर बॉटल २,७८,३६०/- रु. १५,००,०००/- रु. एक पांढऱ्या रंगाची टोयाटा कंपनीची फॉरच्युनर गाडी क्रमांक एम. एच. ४३ ए. बी. ४१११ १८,८०, ७२० /- रु. एकुण मुद्देमाल मिळून आला. याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनला उपरोक्त आरोपी विरुद्ध कलम १०९ भादंवी सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८०, ८३, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि प्रदिप सोनवणे करीत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, स्था. गु. शा. धुळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक सचिन साळुंखे, पोउनि प्रदिप सोनवणे, पोहेकाँ प्रकाश सोनवणे, पोहेकौं मनोज शिरसाठ, पोना विशाल मोहने, पोना दत्तु कोळी, पोशि राकेश बोरसे, पोशि मकरंद पाटील, पोशि विजय पाटील, पोशि सोमनाथ पाटील, चापोशि दावल सैदाणे, चापोशि पंकज बाघ आदिंचा सहभाग आहे. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या