*आईने रागावल्याने शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना.....*

भाटपुरर येथे रानार विनोद सुरेश परदेशी याला आईने काम धंदा करीत नसल्यामुळे आईने रागावल्याने शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. सदर तरुणाचा मृतदेह तापी नदी पात्रात गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्यावर तरगतांना आढळून आला आहे. विनोद सुरेश परदेशी ( २५) रा. तऱ्हाडी असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. या अगोदर शहर पोलीस ठाण्यात सदर तरुण २२ जानेवारी पासून बेपत्ता असल्याची तक्रार मोठ्या भावाने दाखल केली होती. त्याचा पोलिसांकडून शोध घेणे सुरू होते. दरम्यान, २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गिधाडेलगत तापी नदी पात्रात एक अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. मृतदेहाबाबत शिंदखेडा व शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तपासांअती सदर मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सदरचा मृतदेह हा बेपत्ता असलेल्या तऱ्हाडी गावातील विनोद परदेशी या २५ वर्षीय तरुणाचा असल्याची ओळख केल्यानंतर सदर मृतदेह शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतता. पुढील कारवाई शहर पोलिस करीत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा एकत्र परिवार असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या