*गांधीधामपुरी एक्सप्रेसला आग, दोन डबे जळून खाक.....*

नंदूरबार रेल्वे स्टेशन वर गांधीधाम पुरी रेल्वेला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गांधीधाम पुरी 12993 रेल्वे सकाळी 7.50 वाजता सुरत येथून वेळेवर निघाली नंदूरबार रेल्वे स्थानकावर 10.10 मिनिटांनी पोहचणार होती मात्र नंदूरबार रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड किमी अंतरावर पेंट्री डब्याला भीषण आग लागली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी चैन खेचत गाडी थांबविली. यावेळी पोलीस दलासह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 11.50 पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू होते स्वयंपाक बनवितांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत माहिती नंतरच याबाबत आगीचे कारण स्पष्ट होईल.

टिप्पण्या